letras.top
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

letra de runzuntya pakhara (from "tila lavite mi raktacha") - usha mangeshkar

Loading...

घागर घुमूंदे घुमूंदे, रामा, पावा वाजू दे
आला शंकरुबा शंकरुबा, गवर माझी लाजू दे

रुणझुणत्या पांखरा, जा रे माझ्या माहेरा
आली गौराई अंगणी तिला लिंबलोण करा

माझं माहेर सावली, उभी दारात माऊली
तिच्या काळजात बाई माया-ममतेचा झरा

मला माहेरी पाठवा, मला माऊली भेटवा
माझ्या आईच्या पंखात मला मिळू दे उबारा

सौभाग्याचं लेणं, गवर माझी लेवू दे
मोरपंखी चोळी गवर माझी घालू दे

मला पुसते माऊली, आले कोणत्या पाऊली
माझं गौराईचं पाय माझा सोन्याचा उंबरा

गवर गौरी ग गौरी ग, झिम्मा फुगडी खेळू दे
हिरव्या रानात रानात गवर माझी नाचू दे

मी हो बहीण लाडकी, पंचप्राणांच्या तबकी
दिली कुर्हाडीची ओवाळणी, त्याचं भाव करा

माया ममतेची ममतेची, आई मला भेटू दे
माहेरपणाचं पणाचं सुख मला लुटू दे

कशी माहेराला येऊ, शिवंवरी उभा भाऊ
गेला दगड मातीनं ओटी भरून माघारा

गवर गौरी ग गौरी ग, झिम्मा फुगडी खेळू दे
हिरव्या रानात रानात गवर माझी नाचू दे

जीव लाऊन जिवाचा, टिळा लाविते रक्ताचा
आता म्होरल्या जल्मात नदी भेटु दे सागरा

letras aleatórias

MAIS ACESSADOS

Loading...