letras.top
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

letra de rimjhim zarati shravandhara (original) - suman kalyanpur

Loading...

झिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात
प्रिया विण उदास वाटे रात
प्रिया विण उदास वाटे रात

झिमझिम झरती श्रावणधारा

बरस-बरस तु मेघा रिमझिम
आज यायचे माझे प्रियतम
आतुरलेले लोचन माझे…
आतुरलेले लोचन माझे बघती अंधारात

प्रिया विण उदास वाटे रात
झिमझिम झरती श्रावणधारा

प्रासादी या जिवलग येता
प्रासादी या जिवलग येता
कमळ मिठीमधे भृंग भेटता
बरस असा की प्रिया ना जाईल…
बरस असा की प्रिया ना जाईल माघारी दारात

प्रिया विण उदास वाटे रात
झिमझिम झरती श्रावणधारा

मेघा असशी तु आकाशी
वर्षातुन तु कधी वर्षसी
वर्षामागुन वर्षती नयने…
वर्षामागुन वर्षती नयने करती नित बरसात

प्रिया विण उदास वाटे रात
झिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात
प्रिया विण उदास वाटे रात

letras aleatórias

MAIS ACESSADOS

Loading...