letras.top
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

letra de original - arun date feat. asha bhosle

Loading...

ऊन असो वा असो सावली, काटे अथवा फुले असू दे
या वाटेवर तुझ्या संगती जीव जडवुनी मला हसू दे

कधी निराशा खिन्न दाटली, कधी भोवती रान पेटले
परि अचानक वळणावरती निळेनिळे चांदणे भेटले
गूज मनातिल सांगत तुजला चांदण्यात या मला बसू दे

कळी एकदा रुसुनि म्हणाली, “नाही मी भुलाणारच नाही,
किती जरी केलीस आर्जवे तरिही मी फुलणारच नाही!”
फुलून आली कधी न कळले, तशी लाजरी पुन्हा रुसू दे

सांजघनाचा सोनकेवडा भिजवित आली ही हळवी सर
तुझ्या नि माझ्या भवतीचे जग स्वप्नापरी हे झाले धूसर
तुला बिलगुनी चिंब भिजू दे, असे अनावर सुख बरसू दे

letras aleatórias

MAIS ACESSADOS

Loading...